माजी आमदाराच्या मुलीवर बलात्कार !

माजी आमदाराच्या मुलीवर बलात्कार !

पंजाब – पंजाबमध्ये एका माजी आमदाराच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. मानसा जिल्ह्यातील एका माजी आमदाराच्या अल्पवयीन मुलीवर एक व्यापारी आणि त्याच्या मुलानं बलात्कार केला असल्याची माहिती आहे. या मुलीला अश्लिल चित्रफीत दाखवून सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. आत्मा सिंह असं या व्यापा-याचं नाव असून त्याने आपल्या मुलासह तिच्यावर गेली तीन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केले आहेत. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान वडिलांच्या निधनानंतर आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे पीडित मुलगी आत्मा सिंह या व्यापा-याच्या घरी घरकाम करत होती. यादरम्यान व्यापा-याच्या मुलाची वाईट नजर तिच्यावर पडली. आणि त्याने या मुलीला अश्लिल चित्रफीत दाखवून तिच्यावर बलात्कार केला. एवढच नाही तर याबाबत पीडितेनं या मुलाचं कृत्य तिच्या वडिलांना म्हणजे आत्मा सिंहला सांगितलं असता त्यानंही तिच्या मजबुरीचा फायदा घेत अश्लिल चित्रफीत दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. गेली तीन महिन्यांपासून या नराधमांनी हे कृत्य केलं असून त्यांच्या या कृत्याचा अखेर भांडाफोड झाला आहे. दिवसेंदिवस या मुलीवर अत्याचार वाढत असल्यामुळे तिने मोठ्या हिंमतीने सर्व हकिकत तिच्या आईला सांगितली. त्यानंतर या दोघींनी पोलिसांमध्ये धाव घेतली असून आत्मा सिंह आणि त्याच्या मुलावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान आत्मा सिंह हा कपडा व्यापारी असून गुन्हा दाखल झाल्यापासून दोघंही फरार झाले आहेत. या दोघांचा तपास पोलीस घेत आहेत.

 

COMMENTS