उद्यापासून सुरू होणार गोरेगावपर्यंत हार्बर लोकल !

उद्यापासून सुरू होणार गोरेगावपर्यंत हार्बर लोकल !

मुंबई – गोरेगाव स्थानकापर्यंत हार्बर लाईनचा विस्तार पूर्ण झाला असून उद्यापासून गोरेगावपर्यंत हार्बर लोकल सुरु होणार आहे. या मार्गाचे उद्घाटन  रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या सायंकाळी गोरेगाव स्थानकावर होणार आहे. या मार्गासाठी 316 कोटींचा खर्च करण्यात आले असून हजारो प्रवाशांना या लोकलचा फायदा होणार आहे.  त्याचसोबत सीएसएमटी, डॉकयार्ड रोड, ठाणे,लोणावळा स्थानकातील नवीन सरकते जीने, बोरिवली, दादर(पश्चिम), डॉकयार्ड रोड, वडाळा रोड, चेंबूर, लोणावळा स्थानकातील लिफ्टचेही उद्या उद्घाटन करण्यात येणार आहे.

दरम्यान चुनाभट्टी स्थानक पादचारी पूल आणि  विरार इथल्या विस्तारित पादचारी पुलाचे ही उदघाटन पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील सर्व स्थानकावर लावण्यात आलेल्या एल. इ. डी. लाइट्स, पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर आणि सांताक्रूझ स्थानकात लावण्यात आलेल्या सोलार पॅनलचही उद्या लोकार्पण करण्यात येणार आहे.

 

COMMENTS