सरकार दाद देईना, विरोधक मदतील येईना, हरभरा खरेदी बंद झाल्याने शेतक-यांची दैना !

सरकार दाद देईना, विरोधक मदतील येईना, हरभरा खरेदी बंद झाल्याने शेतक-यांची दैना !

उस्मानाबाद –  गेल्या अनेक दिवसांपासून हरभऱ्याच्या खरेदीने शेतकऱ्यांची झोप उडविली आहे. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या घरात सध्या हरभरा पडून आहे. त्यातच शासनाने खरेदी थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतक-याची सगळीकडून कोंडी झाली आहे. सरकार तर शेतक-यांशी निर्दयीपणे वागतच आहे. मात्र विरोधकांनाही शेतक-यांबाबत काही कळवळा असल्याचं दिसत नाही. शेतकरी संघटना असो किंवा विरोधी पक्ष असो शेतक-यांसाठी न्याय देण्यासाठी त्यांना रस्त्यावर उतरण्याची हिम्मत होत नाही.

शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे सांगणारे स्वयंघोषीत नेतेही सध्या गायब झाले आहेत. एरवी कुठल्याही आंदोलनात सहभागी होणारे शेतकरी संघटनेचे नेते हरपल्यासारखी स्थिती झाली आहे. तर विरोधी पक्षातील नेते केवळ कागदोपत्री पत्रव्यवहार करून खूप काही करीत असल्याचे दाखवित आहेत. आंदोलनाची फुसकी डरकाळी फोडून स्वतःचं हासं करून घेत आहेत. सरकारला घाम फोडील असं कोणतही आंदोलन कोणीही करत नाही, मोठा मोर्चा काढलया, शेतकऱ्यांच्या मागण्या हपदरात पाडून घेतल्यात असे एकही काम विरोधकांना करता आल्याचे दिसत नाही. राज्यात अनेक जिल्ह्यात अशीची स्थिती आहे.

मनसेकडून शहरात मराठी पाट्यासाठी आंदोलन करून स्टंटबाजी केली. मात्र ज्या शेतकऱ्यांसाठी सध्या आंदोलनाची गरज आहे. या प्रश्नाकडे बघायलाही मनसेचे नेते तयार नाहीत. सरकार हरभरा खरेदी करत नाही, विरोधक त्याची दखल घेत नाहीत, मग शेतक-याने पहायचं कुणाकडं असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय. सत्ताधा-यांचं आणि विरोधकांचं काही साटलोटं तर नाही ना अशी शंकाही आता शेतकरी घेऊ लागलाय.

COMMENTS