यवतमाळ : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देशातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. त्यांनी राज्यात आणि केंद्रात विविध पदावरून काम करीत असताना आपल्या कामाचा ठस्सा उमठवला आहे. तब्बल पन्नास वर्षे संसदीय कारकिर्द पूर्ण करीत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षण व कृषी यासारख्या पदावर काम करीत असताना अनेकांना त्यांनी टक्कर दिली.
शरद पवार यांनी विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा देशाच्या संसदीय पध्दतीच्या कार्यकारी मंडळात काम केले. हे काम करीत असताना त्यांना अनेकांचा विरोध झाला. यात पवारांनी त्यांना चितपट केले. पण त्यांचr अद्याप कोणीही बरोबरी करू शकले नाही. पण आता त्यांना एका ग्रामपंचायत सदस्यांने टक्कर दिली आहे. तीही ७३ वर्षांच्या वयोवृध्दाने. वाचून थक्क झाला ना. हो यवतमाळ जिल्हयातील एका ग्रामपंचायत सदस्याने शरद पवारांना टक्कर दिली असून ते पवारांच्या कारकिर्दीसोबत बरोबरी करू इच्छीत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी असलेल्या हरिद्वार खडके असे या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. त्यांनी सलग ४५ वर्षे अपराजित राजकीय कारकिर्द पूर्ण केले असून ते करीत असताना चारवेळा सरपंच, तीनदा उपसरपंच पदावर काम केले आहे. सध्या त्यांच्या सावरगड गावच्या ग्रामपंचायतीची निवडणुक जाहीर झाली असून यावेळीही हरिद्वार खडके यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. या अगोदर ते ९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जिंकल्या असून यंदा त्यांची दहावी निवडणूक आहे. या निवडणुकीत त्यांनी बाजी मारल्यास त्यांची पन्नास वर्षांची कारकिर्द पूर्ण होणार असून ते शरद पवार यांच्या विक्रमाशी बरोबरी करू शकतील.
COMMENTS