पुणे,इंदापूर – काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत हर्षवर्धन पाटील यांनी आज माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली आहे. अकलूजमधील शिवरत्न बंगल्यावर जवळपास एक तास मोहिते पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा झाली आहे. त्यानंतर त्यांनी इंदापूर येथील जाहीर कार्यक्रमात मोठ वक्तव्य केलं आहे.
आम्ही साडेचार-पाच वर्षे सत्तेत नव्हतो. पण छोटं-मोठं काम केले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला कधीही नकार दिला नाही, मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने गैरफायदा घेतला असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच 2014 मध्ये जेव्हा आमचा पराभव झाला. तेव्हा सभेला जो कार्यकर्ता आला होता. त्यातील एकही कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नाही. परंतु आता फसवेगिरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असं म्हणत त्यांनी भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहे.
COMMENTS