आगामी लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींसमोर ‘त्या’ प्रशासकीय अधिका-याचं कडवं आव्हान ?

आगामी लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींसमोर ‘त्या’ प्रशासकीय अधिका-याचं कडवं आव्हान ?

पुणे हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासमोर प्रसिद्ध प्रशासकीय अधिकारी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचं कडवं आव्हान असणार असल्याची शक्यता आहे. कारण येत्या लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात मुळे उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या देशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सचिवपदाची धुरा सांभाळणारे ज्ञानेश्वर मुळे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील लाट या गावचे आहेत. त्यामुळे ते आपल्याच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान ज्ञानेश्वर मुळे हे येत्या डिसेंबरमध्ये निवृत्त होणार आहे. त्यामुळे ते राजकारणात उतरणार असल्याची चर्चा असून याबाबत त्यांना विचारलं असता “मला वाटतं चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे. मी भाजपच्या जवळचा आहे, हा आरोप पूर्णत: चुकीचा आहे. मी सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटतो. मी 2019 ची निवडणूक लढवण्याबाबतच्या चर्चेबद्दल बोलायचं झालंच, तर सध्य स्थितीला माझा होकार किंवा नकार नाही असं मुळे यांनी म्हटलं आहे. ज्ञानेश्वर मुळे यांच्या  ‘माती, पंख नि आकाश’, ‘पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया’, ‘शांती की अफवांए’, ‘होतच नाही सकाळ’,  ज्ञानेश्वर मुळे की कविताएः प्रातिनिधीक संकलन या पुस्तकांचं प्रकाशन, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलं.  त्यानंतर ते बोलत होते. त्यामुळे जर ज्ञानेश्वर मुळे यांनी निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं, तर राजू शेट्टी यांच्यापुढे त्यांचं मोठं आव्हान असणार आहे.

COMMENTS