वैद्यनाथ कारखान्यातील मृतांना सहा लाखांची मदत, पंकजा मुंडेंनी घेतली जखमींची भेट

वैद्यनाथ कारखान्यातील मृतांना सहा लाखांची मदत, पंकजा मुंडेंनी घेतली जखमींची भेट

बीड –  परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात गरम उसाच्या रसाची टाकी फुटून 4 कामगारांचा मृत्यू झाला आहे, तसेच दुर्घटनेतील 5 जणांवर उपचार सुरु आहेत. त्या सर्वांची प्रकृती चिंताजनक असून या कारखान्याच्या अध्यक्ष असलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जखमींची भेट घेतली आहे. तसेच या घटेनेतील मृतांना सहा लाखांची मदत त्यांनी जाहीर केली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना कारखान्यातर्फे तीन लाख, मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपये आणि कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांच्यावतीने वैयक्तिक एक लाख, असे एकूण सहा लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली.तसेच जखमींना दीड लाख रुपयांची मदत देणार असून मृताच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कारखान्याच्या सेवेत सामावून घेणार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

जखमींपैकी चार जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सुभाष गोपीनाथ कराड, गौतम घुमरे, मधुकर पंढरीनाथ आदनाक आणि सुनील भंडारे अशी मृतांची नावं आहेत.

COMMENTS