नाना पटोलेनंतर आता भाजप आमदारचे बंड ?

नाना पटोलेनंतर आता भाजप आमदारचे बंड ?

नागपूर – केंद्र आणि राज्य सरकारची शेतकरी विरोधी धोरणे आणि त्यातून होणारी घुसमट यामुळे नाना पटोले यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्याचा भडका विझतो न विझतो तोपर्यंत आता भाजपचे आमदार बंड करण्याच्या पवित्र्यात असल्याची चर्चा आहे. भाजपचे विदर्भातील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राज्य सरकावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.

या पत्रात देशमुख यांनी राज्य सरकार विदर्भाकडे, शेतक-यांकडे आणि युवकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. वेगळ्या विदर्भासह इतर दिलेल्या आश्वासनांकडे राज्य सरकारने लक्ष दिले नसल्याचाही आरोप पत्रात करण्यात आला आहे. नागपुरातील मेट्रो रेल्वेचा प्रकल्प थांबवून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती कार्यक्रम घ्यावा, असे सरकारला का वाटत नाही, असाही प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला आहे. देशमुख यांच्या या पत्रामुळे आमदारांमध्येही सरकाविरोधात खदखद वाढत असल्याचं चित्र निर्माण झालंय. नाना पटोलेंकडे दुर्लक्ष करणारे भाजपचे हायकमांड आता आशिष देशमुख यांच्या पत्राला कसे उत्तर देतात आणि देशमुखांची नाराजी दूर होते की तेही नाना पटोलेंच्या पावलावर पाऊल ठेवणार ते पहावं लागणार आहे.

विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनाच्या तोंडावर  हा प्रकार झाल्याने विरोधाकांच्या हातात आयतच कोलीत मिळालं आहे. शेतकरी आत्महत्या, शेतमालाचे पडलेले भाव, कर्जमफी या मुद्द्यावरुन विरोधाकांनी तोफगोळा एकत्र केलेला असताना भाजप आमदारानेच हे प्रश्न उपस्थित केल्यानं सरकारची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.

 

COMMENTS