हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी जयराम ठाकूर विराजमान !

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी जयराम ठाकूर विराजमान !

हिमाचल प्रदेश – हिमाचाल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी जयराम ठाकूर विराजमान झाले आहेत. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी जयराम ठाकूर आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील ११ मंत्र्यांना शपथ दिली. यावेळी भाजपचे नेते सुरेश भारद्वाज यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. महेंद्र सिंह, किशन कपूर आणि सुरेश भारद्वाज यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली तर अनिल शर्मा, सरवीन चौधरी, विरेंद्र कनवर, विक्रम सिंह आणि राम लाल मारकंडा यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

ऐतिहासिक रिज मैदानावर हा शपथविधी सोहळा सुरु आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष अमित शाह, माजी उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी आणि केंद्रीय मंत्र्यांसह इतर राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित होते. विशेष म्हणजे हिमाचल प्रदेशातील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणारे पंतप्रधान मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत.

हमाचलप्रदेशमध्ये  भाजपाने घवघवीत यश मिळवले पण मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेम कुमार धुमल यांचा पराभव झाल्यामुळे तिथे मुख्यमंत्रीपदावरुन पेच निर्माण झाला होता. अखेर नव्याने निवडून आलेल्या सर्व आमदारांनी एकमताने जयराम ठाकूर यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली आहे.

 

COMMENTS