विजय रुपानींचं अर्ध मंत्रिमंडळ अंडरग्रॅज्युएट, 90 टक्के मंत्री कोट्यधिश !

विजय रुपानींचं अर्ध मंत्रिमंडळ अंडरग्रॅज्युएट, 90 टक्के मंत्री कोट्यधिश !

नवी दिल्ली – गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काल विजय रुपानी यांचा शपथविधी झाला. रुपानी यांच्यासोबत तब्बल 19 मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. या मंत्रीमंडळातील मुख्यमंत्र्यांसह 20 मंत्र्यांपैकी 18 मंत्री कोट्यधीश आहेत. मंत्र्यांनी निवडणुकीच्यावेळी भरलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारावर एडीआर या संस्थेने केलेल्या विश्लेषणात ही बाब पुढे आली आहे. या श्रीमंत मंत्र्यांमध्ये सर्वाधिक श्रीमंत मंत्री हे उद्योगपती अंबानी यांचे नातेवाईक असलेले सौरभ पटेल आहेत. सौरभ पटेल हे अब्जाधीश असून त्यांची संपत्ती 123 कोटी 78 लाख एवढी आहे. मंत्र्यांची सरासरी संपत्ती ही 13.34 कोटी रुपेय एवढी आहे.

सौरभ पटेल यांच्या नंतर श्रीमंत मंत्र्यांमध्ये पुरुषोत्तमभाई सोळंकी यांचा नंबर लागतो. त्यांची संपत्ती 45 कोटी रुपये आहे. त्यांच्यानंतर राडिया विठ्ठलभाई यांचा नंबर लागतो. त्यांची संपत्ती 28 कोटी रुपये आहे. मंत्रिमंडळातील सर्वात गरीब मंत्री हे खबाड बच्चुभाई मेघवानी हे आहेत. त्यांची संपत्ती 35 लाख 45 हजार रुपये एवढी आहे. 19 पैकी तब्बल 9 मंत्री हे 5 ते 12 वी पर्य़ंतच शिकलेले आहेत. म्हणज्येच रुपानी यांच्या मंत्रिमंडळातील जवळपास 45 टक्के मंत्री अंडरग्रॅज्युअट आहेत. तर इतर 10 मंत्री हे ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आहेत.

या मंत्र्यांपैकी 3 जणांवर म्हणज्येच 15 टक्के मंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या मंत्रिमंडळात एकमेव महिला मंत्र्यांचा समावेश आहे. विभावरीबेन दवे असं त्यांचं नाव असून त्या तिस-यांदा आमदार झाल्या आहेत. रुपानी याचांच्या मंत्रीमंडळातील तब्बल 17 मंत्री हे 51 ते 70 वयोगटातील आहेत. तर तीन मंत्री हे 31 ते 50 या वयोगटातील आहेत. एडीआर या संस्थने जाही केलेल्या पत्रकार ही माहिती देण्यात आली आहे.

COMMENTS