लोकसभेसाठी संधी मिळाली नाही तर दुसरी कुठलीच निवडणूक लढवणार नाही –भाजप आमदार

लोकसभेसाठी संधी मिळाली नाही तर दुसरी कुठलीच निवडणूक लढवणार नाही –भाजप आमदार

पुणे – लोकसभेसाठी संधी मिळाली नाही तर दुसरी कुठलीच निवडणूक लढवणार नसल्याचं वक्तव्य भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलं आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून आपण निवडणूक लढविणार असल्याचेही जगताप यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जगताप यांच्या वक्तव्यानंतर आता त्यांना मावळमध्ये लोकसभेसाठी संधी मिळणार आहे का याकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान जगताप यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंगअप्पा बारणे आणि त्यांच्यातच काट्याची टक्कर होणार असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान आपल्याविरोधात कोणीही उमेदवार असेना, 2019 ला मीच शिवसेनेचा लोकसभेत पुन्हा खासदार असणार असल्याचं वक्तव्य खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांनी केलं होतं. त्यानंतर आता जगताप यांनी बारणे यांना थेट आव्हान दिलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार असल्याचं दिसून येत आहे.

 

COMMENTS