महात्मा गांधी यांच्यावरील वादग्रस्त ट्विट भोवलं, आयएएस महिला अधिका-याची बदली !

महात्मा गांधी यांच्यावरील वादग्रस्त ट्विट भोवलं, आयएएस महिला अधिका-याची बदली !

मुंबई – आयएएस अधिकारी निधी चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्यावर केलेलं वादग्रस्त ट्विट भोवलं आहे. निधी चौधरी यांची मुंबई महापालिकेतून मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. चौधरी यांची मंत्रालयात पाणी पुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे.
चौधरी यांना राज्य सरकारनं कारणे दाखवा नोटीस पाठवली असून चौधरी यांच्या ट्विटची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत निधी चौधरी यांची मुंबई महापालिकेच्या उपायुक्त पदावरुन मंत्रालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान निधी चौधरी यांनी 17 मे रोजी वादग्रस्त ट्वीट केलं होतं. ‘महात्मा गांधी यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. पण, आता वेळ आली आहे…जे रस्ते, संस्थांना गांधींचे नाव दिले आहे, ते काढून टाकावे…जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत…तसेच नोटांवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा…हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल…30-1-1948 साठी थँक्यू गोडसे.’ असे वादग्रस्त ट्विट करुन महात्मा गांधींच्या पार्थिवाचं छायाचित्र त्यासोबत शेअर केलं होतं. त्यानंतर त्यांचं हे ट्विट काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यावर लोकांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत असल्या. त्यानंतर याची दखल घेत निधी चौधरी यांची मुंबई महापालिकेतून मंत्रालयात बदली करण्यात आली आहे.

COMMENTS