पुन्हा एकदा एकत्र बसून बोलूया, पंतप्रधान मोदींना जुन्या मित्राचं निमंत्रण !

पुन्हा एकदा एकत्र बसून बोलूया, पंतप्रधान मोदींना जुन्या मित्राचं निमंत्रण !

अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या जुन्या मित्रानं निमंत्रण दिलं आहे. ट्वीटरवरुन त्यांनी पंतप्रधान मोदींना होळीच्या शुभेच्छा! होळीच्यानिमित्ताने पुन्हा एकदा हॅप्पी होली! चला, पुन्हा एकदा एकत्र बसून बोलुया?, असं ट्वीट त्यांचे जुने मित्र असलेले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केलं आहे. गेली काही दिवसांपासून प्रवीण तोगडीया यांनी मोदी सरकारवर अनेक टीका केल्या आहेत. परंतु यावेळेस त्यांनी आपली भाषा मवाळ ठेवून त्यांना समझोता करण्याची तयारी दर्शवली आहे.

दरम्यान पंतप्रधान मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असताना तोगडिया आणि त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. परंतु नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे ते दुरावले होते. त्यानंतर तोगडिया यांनी केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर सरकारच्या अनेक धोरणांवर जाहीर टीका केली होती. काही दिवसांपूर्वी एका खटल्याप्रकरणी पोलीस तोगडीया यांना अहमदाबादमध्ये अटक करण्यासाठी गेले होते. मात्र, त्यावेळी तोगडिया संपूर्ण दिवस गायब झाले होते. त्यानंतर ते एका रुग्णालयात बेशुद्धाअवस्थेत सापडले होते. या घटनेनंतर तोगडिया यांनी राजस्थान पोलिसांना आपला एन्काऊंटर करायचा होता, असा आरोप केला होता. परंतु तोगडिया यांनी केलेल्या या ट्वीटनंतर त्यांची भाष मवाळ झाली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे तोगडिया यांच्या ट्वीटनंतर पंतप्रधान मोदी त्यांच्याशी समझोता करणार का असा सवाल त्यांच्या चाहत्यांना पडतोय.

COMMENTS