मुंबई – तुरूंगातील जीवनाविषयी आपण अनेकवेळा ऐकालं असेल किंवा पुस्तकातून वाचलं असे. सिनेमा आणि मालिकांमधून तुरूंगातील जीवन पडद्यावर दिसतं. मात्र, प्रत्यक्षात तुरूंगातील जीवन कसं असते. हे सर्वसामान्य लोकांना बघालया मिळत नाही. त्यासाठी एक तर काही तर गुन्हा करूनच तरुंगात जावे लागते. पण राज्य सरकारच्या नवीन निर्णयानुसार आता आपल्याला थेट तरुंगात जावून तिथंल जीवन बघालया मिळणार आहे. याची सुरुवात पुण्यातील येरवडा कारागृहापासून होत आहे. त्याचे उद्घाटन २६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. राज्यात ६० तुरूंग आहे. जवळपास २४ हजार कैदी या तुरूंगात आहेत. ३ हजार कैदी तात्पुरत्या तुरूंगात आहेत. येरवडा तुरूंगात घडलेल्या ज्या ऐतिहासिक घटना आहे. त्या नागरिकांना बघता येणार आहे. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबंडेकर यांच्यामध्ये जिथे पुणे करार झाला, ती जागा व्यवस्थित आहे. ज्या बराकीमध्ये महात्मा गांधींना ठेवलं होतं. तोही व्यवस्थित आहे. मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू यांना ठेवण्यात आलेले सेल आहेत. ते विद्यार्थ्यांना, नागरिकांना बघता येणार आहे. त्यानिमित्ताने इतिहासाबद्दल संशोधन करणाऱ्यांनाही याचा फायदा होईल. येरवडा जेलपासून याची सुरूवात झाल्यानंतर राज्यातील इतर तुरूंगात टप्प्याटप्याने पर्यटन योजना सुरू केली जाईल, असं देशमुख यांनी सांगितले
COMMENTS