माजी मंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का, जामखेड तालुक्यातील ‘हे’ नेते करणार राष्ट्रवादीत प्रवेश!

माजी मंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का, जामखेड तालुक्यातील ‘हे’ नेते करणार राष्ट्रवादीत प्रवेश!

अहमदनगर – जामखेड तालुक्यात भाजपला मोठे खिंडार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांसह दहा नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्यासह दहा नगरसेवक राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे.

दरम्यान नगराध्यक्ष निखल घायतडक यांनी दोन वषापूर्वी नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद स्वूकारले होते. आरक्षण अनुसूचित जातीसाठी असल्यामुळे निखिल घायतडक नगराध्यक्ष झाले होते. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून निखिल घायतडक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी पक्षाकडून दबावतंत्र चालू होते असं घायतडक यांनी म्हटलं आहे. परंतु लॉकडाऊनमुळे थांबलेले दबावतंत्र दोन दिवसात पून्हा सूरू झाले. याबाबत नगराध्यक्षांनी आपल्या सहकारी नगरसेवकांना याची कल्पना दिली. त्यानुसार माजी नगराध्यक्षा प्रीती विकास राळेभात, नगरसेवक शामीर सय्यद, संदीप गायकवाड, सुमन आशोक शेळके , मेहरुनिसा शफी कूरेशी, जकीया आयुब शेख, ऋषिकेश बांबरसे, गूलशन अंधारे, लता संदीप गायकवाड, सुरेखा भाऊराव राळेभात या दहा नगरसेवकांनी आपले राजीनामे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्याकडे दिले होते.

परंतु शहराच्या विकासकामात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आपण सर्वजण मिळून एकजुटीने काम करणार असल्याची भूमिका घेतली असल्याचं नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी म्हटलं आहे. तसेच या दहा नगरसेवकांनी आपले राजीनामे न देता आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे ठरवले असल्याचं ते म्हणाले आहेत.

COMMENTS