मी दादा किंवा ताईंमुळे प्रदेशाध्यक्ष झालो नाही – जयंत पाटील

मी दादा किंवा ताईंमुळे प्रदेशाध्यक्ष झालो नाही – जयंत पाटील

नागपूर – मी दादा किंवा ताईंमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रदेशाध्यक्ष झालो नाही असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. ते नागपूरमध्ये आयोजित केलेल्या लोकमत विधीमंडळ पुरस्काराच्या कार्यक्रमात बोलत होते. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे. या कार्यक्रमात उज्ज्व निकम यांनी राज्यातील चार प्रमुख नेत्यांना म्हणजेच भाजपचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहनमंत्र दिवाकर रावते, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि रष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रश्न विचारले.

दरम्यान यावेळी उज्ज्वल निकम यांनी आपल्या शैलीत प्रश्न विचारत या चारही नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु या चारही नेत्यांनी आपल्या खास शैलीत उत्तरं दिली. यावेळी जयंत पाटील यांना निकम यांनी, तुम्हाला प्रदेशाध्यक्ष पद हे दादामुळे नाही तर ताईंमुळे मिळाले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तुम्ही दादागिरीला घाबरत नाही असं म्हणतात, हे खरं आहे का? असा प्रश्न केला. यावेळी जयंत पाटील यांनी आपल्या खास शैलीत उत्तर देत खरं पाहिलं तर प्रदेशाध्यक्षपद हे दादा किंवा ताईमुळे नाही तर शरद पवार साहेबांमुळे मिळालं असल्याचं उत्तर दिलं.

COMMENTS