नेत्यांच्या मागे-पुढे करणा-यांना पक्षात पद नाही – जयंत पाटील

नेत्यांच्या मागे-पुढे करणा-यांना पक्षात पद नाही – जयंत पाटील

मुंबई – या पुढील काळात पक्षामध्ये काम करणा-यांनाच पदे दिली जातील, फक्त नेत्यांच्या पुढे-मागे करणा-यांना नाही असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. दोन दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांच्याकडे पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं आहे. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी पक्षामध्ये फेरबदल केले जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पक्षामध्ये काम करणा-यांनाच पक्षात पद दिलं जाईल फक्त नेत्यांच्या मागे-पुढे फिरणा-यांना पद दिलं जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान प्रदेश पदाधिकारी नियुक्त करताना तरुण आणि नव्या चेहर्‍यांना संधी द्या. जे 10-10 वर्ष पक्षात पदाधिकारी राहिले आहेत,  त्यांनी थोडं बाजूला होऊन पक्षाचे काम करावे. असा सल्ला अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीदरम्यान दिला होता. त्यानंतर आता जयंत पाटील यांनी पक्षातील पदाधिका-यांना तंबी दिली आहे. त्यामुळे लवकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फेरबदल होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

COMMENTS