सुरक्षाव्यवस्थेवरुन सरकारचे वाभाडे, संभाजी भिडेंबाबत मात्र जयंत पाटलांचं सोयीस्कर मौन !

सुरक्षाव्यवस्थेवरुन सरकारचे वाभाडे, संभाजी भिडेंबाबत मात्र जयंत पाटलांचं सोयीस्कर मौन !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते जयंत पाटील यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून सरकारवर चौफेर टोलेबाजी करत वाभाडे काढले आहेत. मात्र संभाजी भिडेंच्या अटकेबाबत सोयीस्कर मौन पाळल्याची चर्चा विधानभवनात रंगली आहे. यापूर्वीही सोशल मीडियाच्या माध्यमातून जयंत पाटील आणि संभाजी भिडे यांच्यातील जवळीकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा जयंत पाटील यांनी संभाजी भिडेंबाबत मौन बाळगल्याची जोरदार चर्चा विधानभवनात रंगली असल्याचं पहावयास मिळालं आहे.

या मुद्द्यांवर केलं लक्ष्य –

राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्र्याचे शहर असलेले नागपूर हेच असुरक्षित शहर झाले आहे. नागपूरमध्ये सीसीटीव्ही लावण्याची घोषणा करून तीन वर्षे उलटले अजूनही सीसीटीव्ही बसले नाहीत. सीसीटीव्ही बसले असते तर ही वेळच आली नसती. नागपूरातील वाढत चाललेली गून्हेगारी ही राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती दर्शवते आहे. तसेच राज्यात भीमा-कोरेगाव सारखे प्रकरण घडतात. नाशिक जिल्ह्यात जिवंत काडतूसे सापडत आहेत. अहमदनगरमध्ये पार्सल बॉम्ब फूटतो. सुजाता पाटील सारख्या महिला पोलीस अधिकारी यांना पोलिसांकडून कोणती वागणूक मिळते ही सर्व प्रकरणे पाहिली असता राज्यातील महिलांची परिस्थिती काय आहे हे लक्षात येत असल्याचे सांगत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची अनेक उदाहरणे जयंत पाटील यांनी सांगितील आहेत.

COMMENTS