भाजपमध्ये जाणार का ? काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचा खुलासा !

भाजपमध्ये जाणार का ? काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचा खुलासा !

मुंबई – साताऱ्यातील माणखटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत जयकुमार गोरे यांनी खुलासा केला आहे.’गिरीश महाजन यांच्यासोबतची भेट माझ्या मतदारसंघातील पाणी प्रश्नाबाबत होती. मी कालही काँग्रेस पक्षात होतो आणि उद्याही राहील. आघाडी करताना स्थानिक पातळीचा विचार करून करावी,’ असं म्हणत जयकुमार गोरे यांनी भाजपप्रवेशाचं वृत्त फेटाळून लावलम आहे.

दरम्यान गोरे यांनी नुकतीच भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा रंगली होती. यावेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हेदेखील उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वीच गोरे यांनी संगमनेर इथं काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजप प्रवेश इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू झाल्या असल्याची चर्चा रंगत असतानाच गोरे यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. परंतु आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचं गोरे यांनी स्पष्ट केलं आहे.

COMMENTS