मुंबई – कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारन्टाइन करून घेतलं आहे. ठाण्यातील या कोरोना पॉझिटिव्ह पीएसआयच्या संपर्कात अनेक पत्रकारही आले आहेत. त्या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून यातील एक पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यानंतर आव्हाड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारन्टाइन करून घेतलं आहे.
दरम्यान जितेंद्र आव्हाड आपला मतदारसंघ असलेल्या कळवा आणि मुंब्र्यात रस्त्यावर उतरून लॉकडाऊनच्या स्थितीचा वारंवार आढावा घेत होते. त्यावेळी त्यांच्या एका पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क आला जो आता कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारन्टाइन करू घेतल्याची माहिती आहे.
COMMENTS