दहावीच्या भूगोल विषयाच्या पेपरसह नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द !

दहावीच्या भूगोल विषयाच्या पेपरसह नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द !

मुंबई – ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला आहे.  यासोबतच नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. आधीचे सरासरी मार्क लक्षात घेत संबंधित विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत. त्यानुसार नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दहावी आणि बारावीला प्रवेश मिळणार आहे. याबाबतची घोषणा
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

दरम्यान यापूर्वी शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची पुढील इयत्तेत वर्णी लागली होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्या पार्श्वभूमीवर 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला आहे.  यासोबतच नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

COMMENTS