मीडियाशी बोलण्यापूर्वी राहुल गांधींना जोतिरादित्य सिंधियांनी दिला कानमंत्र !

मीडियाशी बोलण्यापूर्वी राहुल गांधींना जोतिरादित्य सिंधियांनी दिला कानमंत्र !

नवी दिल्ली – मीडियासमोर येण्यापूर्वी राहुल गांधी यांना काय बोलायचे आहे तो कानमंत्र ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिला असल्याची माहिती आहे. याबाबतची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं.

दरम्यान मीडियाशी प्रतिक्रिया देण्यापूर्वी राहुल गांधी यांना जोतिरादित्य सिंधिया यांनी कानमंत्र दिला असल्याची माहिती आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्योतिरादित्य सिंधिया हे त्यांच्या शेजारीच इतर खासदारांसोबत उभे होते. राहुल गांधीही तिथे चर्चा करत होते. त्याचवेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आले. त्यानंतर लगेचच मोदी जे करू शकले नाहीत ते मी करून दाखवले आहे हे तुम्हाला प्रसारमाध्यमांना सांगायचे आहे असे ज्योतिरादित्य सिंधियांनी राहुल गांधींना सांगितले. त्यानंतर हेच वाक्य म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. त्यामुळे जोतिरादित्य सिंधिया यांनी राहुल गांधी यांना कानमंत्र दिला असल्याची चर्चा सुरु आहे.

 

COMMENTS