कळंब-परळीत मागील तीन दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. तेथील ठिय्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्रभर विविध जिल्ह्यातील तालुक्यात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. आज कळंब तालुक्यातही तहसील कार्यालयात मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.
दरम्यान, सध्या विधिमंडळात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मागील दोन वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाकडून वेगवेगळे आंदोलने, मोर्चे काढण्यात आले आहेत. आता मूक मोर्चे नाही ‘ठोक मोर्चा’ची घोषणा सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली असून त्याची सुरवात उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातून झाली होती.
मागील तीन दिवसांपासून परळीत मोठ्या प्रमाणात मराठा समाजाने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आज कळंब तालुक्यातही शेकडोच्या संख्येत विविध पक्षाचे, संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. तहसील कार्यालयाच्या आवारात हे ठिय्या आंदोलन सुरू असून शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर मराठा समाजाचे आमदार समाजासाठी राजीनामा देणार का? असा सवालही उपस्थित करण्यात आला. यापुढे हे आंदोलन अजून तीव्र करण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले.
COMMENTS