राहुल गांधींच्या ‘त्या’ शब्दामुळे सभागृहात पिकला हशा !

राहुल गांधींच्या ‘त्या’ शब्दामुळे सभागृहात पिकला हशा !

नवी दिल्ली – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेत  केलेलं भाषण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारलेली मिठी याविषयी देशभरात चर्चेला उधाण आलं आहे. सभागृहातील भाषणादरम्यान राहुल गांधींच्या एका शब्दामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला होता.  पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘बाहर’ जाते है या ऐवजी ‘बार’ जाते है असा शब्द राहुल गांधी यांनी उच्चारल्याने सभागृहात आज एकच हशा पिकला. राहुल गांधी यांच्या या शब्दावर पंतप्रधान मोदी यांनाही हसू आवरले नाही ते देखील जोरजोरात हसू लागले होते.

दरम्यान केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडल्यानंतर आज दिवसभर यावर चर्चा घेण्यात आली. यावरच राहुल गांधी यांनी देखील भाषण केलं. यावेळी बोलताना राहुल गांधी यांची गडबड झाली. ‘मोदीजी बाहर जाते हैं मगर उससे देशको फायदा नहीं होता’ असे म्हणत त्यांच्या विदेश दौऱ्यांवर टीका केली. त्याचवेळी ते गडबडले आणि बाहरे जाते है ऐवजी बार जाते है असं ते म्हणाले त्यामुळे सभागृहात हशा पिकला होता.

 

COMMENTS