कल्याणमध्ये दोन शिवसेना नगरसेविकांमध्ये राडा  

कल्याणमध्ये दोन शिवसेना नगरसेविकांमध्ये राडा  

कल्याण : कल्याणमध्ये शिवसेनेच्या दोन नगरसेविकांमध्ये राडा झालाय. बॅनर लावण्याच्या क्षुल्लक कारणावरुन हा वाद झाला, या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

काळे यांनी मंढारी यांच्या प्रभागात मागच्या टर्ममध्ये झालेल्या कामाचा बॅनर एका सोसायटीने लावल्याने या दोघींमध्ये वाद झाला. शिवसेनेच्या या दोन नगरसेविकांमध्ये बाचाबाची वाढली आणि दोघांनी एकमेकींना हाणामारी देखील केली. ही घटना रविवारी रात्री कल्याण पूर्वेत घडली.  कल्याण पुर्वतील शिवसेना नगरसेविका शीतल मंढारी आणि माधुरी काळे यांच्यात हा राडा झालाय. नगरसेविका शीतल मंढारी या प्रभाग क्र. 98 तर नगरसेविका माधुरी काळे या प्रभाग क्र. 99 च्या नगरसेविका आहेत.

हा वाद पोलिस ठाण्यात गेल्यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी रात्री उशिरा माधुरी काळे यांच्याविरोधात अॅट्रोसिटी आणि मारहाणीचा, तर मंढारी आणि त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या विरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून दोन्ही नगरसेविकांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.

COMMENTS