प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया !

प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया !

मुंबई – भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घटनादुरुस्ती करुन मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकतं असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी घटनादुरुस्ती नेमकी कशी होईल हे शरद पवार यांनी स्पष्ट करावं. तसेच याबाबत पवारांनी स्पष्टीकरण न दिल्यास फक्त मराठा समाजाला खूश करण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केलं होतं असा त्याचा अर्थ निघेल असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं.

दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून घटनादुरुस्तीतून मराठा समाजाला खूश करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी काल विधीमंडळात सर्वपक्षीय बैठक झाली आणि कायदेशीर अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने एकत्र पाऊल पुढे टाकण्याचं ठरवण्यात आलं आहे. तो निर्णय यशस्वी कसा होईल हे पाहणं आमचं काम असून ते जर होऊ शकलं तर हा प्रश्न सुटेल, त्या कामाला अधिक प्राधान्य देणे मला महत्त्वाचे वाटते असंही पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS