“तिनं” मोदींचं ऑटोग्राप घेतलं आणि तिला येऊ लागले लग्नाचे शेकडो प्रस्ताव !

“तिनं” मोदींचं ऑटोग्राप घेतलं आणि तिला येऊ लागले लग्नाचे शेकडो प्रस्ताव !

मिदनापूर – कोणाचं नशीब कधी फळफळेल आणि कोण रातोरात स्टार होईल होईल हे सांगता येत नाही. आता हेच पहा ना. पश्चिम बंगालमधील रितानं मोदींचं ऑटोग्राफ घेतलं आणि रारोतात ती सेलिब्रिटी झाली. तर लग्नाचे हजारो प्रस्ताव येऊ लागले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना तिनं याची कबुली दिली आहे. मी रातोरात सेलिब्रिटी झाली आहे. त्यामुळे मला आणि माझ्या बहिणीला लग्नाचे हजारो प्रस्ताव येऊ लागले आहेत असं रिता सांगते.

              त्याचं झालं असं, पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जुलैला पश्चिम बंगालीमधील मिदनापूरच्या दौ-यावर होते. त्यावेळी सभेच्या ठिकाणचा मंडप कोसळला आणि त्यामध्ये तब्बल 90 जण जखमी झाले. त्या जखमींमध्ये रिता या मुलीचाही समावेश होता. सभा संपल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपुस केली होती. त्यावेळी रिता हिने मोदींना ऑटोग्राफची रिक्वेस्ट केली. मोदींनीही क्षणाचाही विलंब न करता तिला ऑटोग्राफ दिली. ती सोशल मीडियावर व्हायरल झाली. आणि रिता रातोरात सेलिब्रिटी झाली आहे. तिला आणि तिच्या बहिणीला लग्नाचे लाखो प्रस्ताव येत आहेत.

COMMENTS