चंद्रकांत पाटील माझ्या अंगावर धावून आले, आमदार कपिल पाटलांचा आरोप !

चंद्रकांत पाटील माझ्या अंगावर धावून आले, आमदार कपिल पाटलांचा आरोप !

मुंबई – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे माझ्या अंगावर धावून आले असून त्यांनी ‘मी तुला बघून घेईन’ अशी धमकी दिली असल्याचा गंभीर आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला आहे. प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी विधानपरिषदेत आज मोठा गोंधळ झाला होता. प्रशांत परिचारक यांच्याबद्दल आपण प्रश्न विचारल्याने चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर राग व्यक्ते केला आहे. एवढच नाही तर ते माझ्या अंगावर धावून आले असून मी तुला बघून घेईन अशी धमकीही त्यांनी दिली असल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला आहे.


दरम्यान चंद्रकांतदादा माझ्या अंगावर धावून आले त्यावेळी त्यांना दोन ते तीन मंत्र्यांनी पकडून ठेवले होते. अक्षरश: अंगावर धावून आले. तुला बघून घेतो, बदडून काढतो, अशी धमकी राज्याचे महसूलमंत्री देत असतील, तर परिस्थिती गंभीर असल्या कपिल पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच विधीमंडळामध्ये घडलेल्या या घटनेचे स्वत: सभापती आणि सर्व आमदार साक्षीदार आहेत. त्यामुळे इतकं गंभीर वर्तन करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी आत्मपरिक्षण करुन दिलगिरी व्यक्त करावी असंही कपिल पाटील यांनी त्यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS