सकाळी भाजपमध्ये प्रवेश, संध्याकाळी काँग्रेसमध्ये घरवापसी !

सकाळी भाजपमध्ये प्रवेश, संध्याकाळी काँग्रेसमध्ये घरवापसी !

मंगळुरु – कर्नाटकातील राजकारणामध्ये एक विचित्र घटना पहायला मिळाली असून मंगळुरुच्या स्थानिक काँग्रेस नेत्याने सकाळी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर संध्याकाळपर्यंत पुन्हा भाजपला रामराम करुन काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. काँग्रेस नेते सुंदर देवीनागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु काही तासातच त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. सुंदर देवीनागरा यांच्याकडे पनेमनगलुरु प्रांताची जबाबदारी आहे.

दरम्यान रविवारी काँग्रेसचे ओबीसी नेते आणि सहा वेळा आमदार राहिलेले मलिकय्या गुत्तेदार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत गुत्तेदार यांनी भाजपचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला आहे. दरम्यान कर्नाटकमधील निवडणुकीत काँग्रेस भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असून फोडाफोडीचं राजकारण सुरु झालं असल्याचं यावरुन दिसत आहे.

COMMENTS