कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपकडून माफी मागण्याची मागणी !

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपकडून माफी मागण्याची मागणी !

कर्नाटक – कर्नाटकचे नवनिवर्चीत मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मी जनतेच्या नाही तर काँग्रेसच्या आशिर्वादामुळे मुख्यमंत्री झालो असल्याचं वादग्रस्त वक्तव्य कुमारस्वामी यांनी केलं आहे. विधानसभा निवडणुकीत जेडीएसला पूर्णपणे बहूमत देण्याची देण्याची मागणी आम्ही जनतेकडे केली होती. परंतु जनतेनं बहूमत न दिल्यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्यामुळेच मी मुख्यमंत्री झालो आहे. त्यामुळे मी जनतेच्या नाही तर काँग्रेसच्या दबावाखाली आहे असं कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जेडीएसनं स्वबळावर सत्ता स्थापन केली नसून निवडणुकांपूर्वी मी बहूमत देण्याचं आवाहन जनतेला केलं होतं. परंतु जनतेनं तसं न केल्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी मला काँग्रेसचा पाठिंबा घ्यावा लागला. त्यामुळे मी जनतेच्या नाही तर काँग्रेसच्या दबावाखाली असल्याचं कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कुमारस्वामी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपनं जोरदार टीका केली आहे. या वक्तव्याबाबत कुमारस्वामी यांनी जनतेची माफी मागावी असं वक्तव्य भाजपचे नेते येडियुरप्पा यांनी केलं आहे.

तसेच मुख्यमंत्री झाल्यानंतर कुमारस्वामी यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. आमच्या राज्याची ही परंपरा असून कोणीही मुख्यमंत्री झाला तर तो पंतप्रधानांची भेट घेतो असं कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे.

 

 

COMMENTS