निवडणुकीपूर्वी सापडल्या कोट्यवधींच्या बनावट नोटा !

निवडणुकीपूर्वी सापडल्या कोट्यवधींच्या बनावट नोटा !

बेळगाव – बेळगावात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर बनावट नोटांचा साठा सापडला आहे. त्यामुळे बेळगावमध्ये खळबळ उडाली असून बेळगाव शहराच्या विश्वेश्वरय्यानगर परिसरात एका घरावर पोलिसांनी धाड टाकली होती. यामध्ये 500 आणि 2000 च्या सात कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच हे घर सरकारी कर्मचाऱ्याचे निवासस्थान असल्याची माहिती असून या धाडीमध्ये नोटांचे घबाड जप्त करण्यात आलं आहे.

दरम्यान या प्रकरणी अजितकुमार निडोनी याला पोलिसांनी अटक केली असून तो मूळचा विजापूरचा आहे. निवडणुकीत ग्रामीण भागात वाटण्यासाठी या बनावट नोटा आणण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पाचशेच्या 25,300 नोटा आणि दोन हजारांच्या 29,300 नोटा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

COMMENTS