कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – उद्धव ठाकरे

कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – उद्धव ठाकरे

कोल्हापूर – राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता येवू द्या, कर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणून दाखवितो, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नेसरी  येथील जाहीर सभेत सांगितले.
यावेळी ठाकरे म्हणाले,‘कर्नाटकचा मुख्यमंत्री कानडी आलीच पाहिजे असे म्हणतो परंतू मराठी आलीच पाहिजे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणत नाहीत हेच खरे दुर्देव आहे. शिवसेना सीमाभागातील मराठी माणसाच्या मागे कायमच ताकदीने उभी राहिली आहे. ती यापुढेही त्यांना बळ देईल. तुम्ही लोकांनी आज या सभेच्या निमित्ताने चंदगड भगवे करून दाखविले परंतू तेवढ्याने भागणार नाही. शिवसेनेला राज्याची सत्ता द्या. कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही.’
शिवेसेनेचे कोल्हापुरात सहा आमदार आहेत त्यामुळे जिल्ह्याला मंत्रिपदाची मागणी होते. मागणी करण्यात गैर नाही परंतू तुमच्या जिल्ह्यात मंत्रिपदाचे एक पार्सल आहे. ते बिनकामाचे आहे, त्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी काय केले? अशी विचारणा करत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माझी गुप्त भेट झाली. परंतु त्या भेटीबद्दल कुठेच वाच्यता करायची नाही असे ठरले होते.  तरीही पवार यांनी त्याबद्दल जाहीर वाच्यता केली. आम्हाला भेटल्यानंतर पवार मुख्यमंत्र्यांनाही भेटले परंतु हा बाबा तिथे तरी शेतक-यांच्या कर्जमाफीबद्दल काहीतरी बोलेल असे वाटले होते, पण ते तिथे बोलले ते एमसीए बद्दल. असे ठाकरे म्हणाले.

COMMENTS