नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२२ जागांसाठी आज मतदान पार पडलं. पाच वाजेपर्यंत जवळपास ६३ टक्के मतदान झालं असून विविध चॅनल्सनी आपला एक्झिट पोल जाहीर केला आहे. या एक्झिट पोलमध्ये कोणाला किती जागा मिळणार आहेत याचा अंदाज मांडण्यात आला आहे. विविध चॅनल्सनी दिलेला एक्झिट पोल पुढीलप्रमाणे.
टाईम्स नाऊ – व्हीएमआर
काँग्रेस : ९० – १०३
भाजप : ८० – ९३
जेडीएस : ३१ – ३९
इतर : २ – ४
एबीपी – सी व्होटर
काँग्रेस : ९९ – १०९
भाजप : ८७ – ९९
जेडीएस : २१ – ३०
रिपब्लिक टीव्ही
काँग्रेस : ९५ – ११४
भाजप : ७३ – ८२
जेडीएस : ३२ – ४३
इतर : २ – ३
आज तक
काँग्रेस : १०६ – ११८
भाजप : ७९ – ९२
जेडीएस : २२ – ३०
इतर : ००
इंडिया टीव्ही
काँग्रेस : ८७
भाजप : ९७
जेडीएस : ३५
इतर : ००
दरम्यान या एक्झिट पोलमध्ये कर्नाटकात त्रिशंकू अवस्था दिसेल, असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट कौल मिळालेला नसून सत्तेच्या चाव्या जेडीएसकडे जातील, असंही एक्झिट पोल सांगत आहेत. हाती आलेल्या दोन एक्झिट पोलमध्ये भाजपा पुढे दिसतेय तर तीन एक्झिट पोलमध्ये काँग्रेस पुढे दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालानंतरच सर्व गणित उलगडणार आहे.
COMMENTS