कर्नाटक निवडणुकीत अशोक चव्हाणांचा स्ट्राईक रेट 100 !

कर्नाटक निवडणुकीत अशोक चव्हाणांचा स्ट्राईक रेट 100 !

मुंबई – कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस या पक्षाचे महाराष्ट्रातले अनेक नेते बेळगाव आणि मराठी पट्ट्यात प्रचारासाठी गेले होते. काँग्रासकडून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर खानापूर, बेळगाव ग्रामीण, कागवाड आणि बाभळेश्वर या चार मतदारसंघाची जबाबदारी होती. चव्हाण यांनी या चारही ठिकाणी सभा आणि बैठका घेतल्या होत्या. या चारही मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निवडूण आले आहेत. खानापूरमधून डॉ. अंजली निंबाळकर, बेळगाव ग्रामीणमधून लक्ष्मी हेब्बाळकर, कागवाडमधून श्रीमंत पाटील आणि बाभळेश्वरमधून एम. बी. पाटील हे काँग्रेसचे चार उमेदवार विजयी झाले आहेत.

बेळगावमध्ये यंदा महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये फूट पडली होती. त्यामुळे समितीला या निवडणुक भोपळाही फोडता आला नाही. गेल्यावेळी दोन आमदार असलेल्या एकीकरण समितीला यंदा खातंही उगडता आलं नाही. समितीमधील फुटीचा फायदा काँग्रेस आणि भाजपला झाला. बेळगाव जिल्ह्यातील सर्व 18 विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांची सरशी झाली आहे.

COMMENTS