नवी दिल्ली – रामलीला मैदानाचं नाव बदलून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याची मागणी भाजपकडून केली असल्याची माहिती आहे. यावरुन अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. रामलीला मैदानाचं नाव बदलण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचंच नाव बदलण्याची गरज असून तसं केलं तरच आगामी काळात भाजपला मतं मिळतील असा निशाणा आपनं केजरीवालांनी साधला आहे. याबाबतचं ट्वीट अरविंद केजरीवाल यांनी केलं असून रामलीला मैदान इत्यादीचं नाव बदलून भाजपला मतं मिळणार नाहीत. त्यासाठी भाजपला पंतप्रधानांचंच नाव बदलाव लागेल तेंव्हा कुठे त्यांना मतं मिळतील असं केजरीवाल यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
रामलीला मैदान इत्यादि के नाम बदलकर अटल जी के नाम पर रखने से वोट नहीं मिलेंगे
भाजपा को प्रधान मंत्री जी का नाम बदल देना चाहिए। तब शायद कुछ वोट मिल जायें। क्योंकि अब उनके अपने नाम पर तो लोग वोट नहीं दे रहे। https://t.co/156uKuTQ7V
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 25, 2018
दरम्यान वाजपेयी हे रामापेक्षा मोठे आहेत का? असा सवाल आपच्या नेत्या अलका लांबा यांनी केला आहे. त्यावरुन भाजपनं आपला प्रत्युत्तर दिलं असून आप खोटा प्रचार करत असून भगवान राम आम्हा सर्वांसाठी आराध्य आहेत. त्यामुळे रामलीला मैदानाचं नाव बदलण्याची गरज नसल्याचं दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजप आणि आपमध्ये रामलीला मैदानाचं नाव बदलण्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला असल्याचं दिसत आहे.
COMMENTS