अरविंद केजरीवालांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा !

अरविंद केजरीवालांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा !

नवी दिल्ली -केंद्र सरकारविरोधात धरणं आंदोलन करत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनाला आता शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे. केजरीवालांसोबत जे काही  होतंय ते चुकीचं होत असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.’दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केजरीवालांना पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं गेली आठ दिवसांपासून केंद्र सरकारविरोधात आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारच्या दबावामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी दिल्ली सरकारशी असहकार पुकारल्याचा आरोप आपनं केला असून नायब राज्यपालांनी यात हस्तक्षेप करावा या मागणीसाठी केजरीवाल यांनी 7 दिवसांपासन त्यांच्या कार्यालयाबाहेर ठाण मांडली आहे. परंतु त्यानंतरही दखल न घेतल्यानं आम आदमी पक्षानं काल थेट पंतप्रधानांच्या निवासाला घेराव घालण्याचं ठरवलं आहे. तसेच केजरीवाल यांच्या आंदोलनाला कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यानंतर केजरीवाल यांच्या आंदोलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पाठिंबा दर्शवला आहे.

COMMENTS