अजितदादांना भावी मुख्यमंत्री म्हणू नका, नाहीतर … – खडसे

अजितदादांना भावी मुख्यमंत्री म्हणू नका, नाहीतर … – खडसे

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री डॉ. सतिश पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त त्यांचा सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्यासह जिल्ह्यातील अनेक आजी माजी खासदार आणि आमदार उपस्थित होते.

यावेळी झालेल्या भाषणात भाजप नेते एकनाथ खडसे यांनी जोरदार टोलेबाजी केली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि आमदार अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करत असतात. तो धागा पकडत मी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि आमदारांनी असा सल्ला देऊ इच्छितो की यापुढे त्यांनी अजितदादांना भावी मुख्यमंत्री असे म्हणू नये. आपल्या नेत्याचा असा उल्लेख केला तर त्याच्यामागे चौकशींचा ससेमीरा लागतो अशा शब्दात त्यांनी टोलेबाजी केली.

भाजपची राज्यात सत्ता आल्यानंतर त्यांच्याकडेच राज्याचे मुख्यमंत्रीपद जाईल अशी चर्चा होती. त्यांचे कार्यकर्ते नाथाभाऊंचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करत असत. मात्र मुख्यमंत्रीपद तर मिळालं नाहीच. उलट असा उल्लेख केल्यामुळे आपल्यामागे चौकशांचा ससेमीरा सुरू झाला असंच जणू खडसे यांना सुचवायचं होतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

COMMENTS