एकनाथ खडसे, मोहन प्रकाश, पृथ्वीराज चव्हाण एकाच विमानाने दिल्लीला !

एकनाथ खडसे, मोहन प्रकाश, पृथ्वीराज चव्हाण एकाच विमानाने दिल्लीला !

मुंबई – नाराज भाजप नेते एकनाथ खडसे  काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे काल एकाच विमानाने दिल्लीला गेले. त्यामुळे विविध तर्कवितर्क उधाण आलंय.

     काल औरंगाबादमध्ये काँग्रेसचं शिबीर सुरू झालं. ते सुरू असतानाच काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश, पृथ्वीराज चव्हाण हे औरंगाबाद विमानतळाकडे रवाना झाले. तिथे भाजप नेते एकनाथ खडसे हेही होते. तीन नेत्यांमध्ये विमानतळावर सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर औरंगाबाद ते दिल्ली असा प्रवास या तीन नेत्यांनी एकाच विमानाने केला. तीन नेत्यांच्या एकत्र दिल्ली प्रवासाचा हा निव्वळ योगायोग होता की ठरवून केलेला प्रवास होता याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दिल्लीत मात्र खडसे यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली की नाही याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही.

      भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन मंत्रीपद गेल्यानंतर एकनाथ खडसे हे मुख्यमंत्री आणि भाजप यांच्यावर नाराज आहेत. इतर मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांची तातडीने चौकशी होऊन क्लिन चिट दिली जाते. मात्र आपल्याबाबत चौकशीची चालढक केली जाते आणि ती लांबवली जाते असा खडसे यांचा आरोप आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून खडेस हे पक्षाला नेहमीच अडचणीत आणण्याचा प्रय़त्न करत होते. पक्षनेतृत्वावर त्यांनी दबाव आणण्याचाही प्रय़त्न केला. मात्र त्यांची मंत्रिमडळात वर्णी लागली नाही. त्यामुळेच अस्वस्थ झालेले एकनाथ खडसे यांनी काँग्रेसच वाट धरल्याची चर्चा आहे.

COMMENTS