कोल्हापूर – कागल नगरपरिषदेच्या इमारतीला आग

कोल्हापूर – कागल नगरपरिषदेच्या इमारतीला आग

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपरिषदेला काल मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत इमारतीतल्या पहिल्या मजल्यावरील साहित्य आणि कागदपत्रं जळून खाक झाले आहेत.

इमारतीत शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली आगीत अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जळाली आहेत.
दरम्यान,  घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ही आग तात्काळ विझवली. मात्र, या आगीमध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वस्तू आणि कागदपत्रं जळून खाक झाले आहेत.

COMMENTS