प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांचा निषेध करणार, मराठा समाजाचा इशारा !

प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांचा निषेध करणार, मराठा समाजाचा इशारा !

कोल्हापूर – मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सरकारला अल्टिमेटम देण्यात आला असून एका महिन्याच्या आत मागण्या मान्य झाल्या नाही तर मंत्र्याच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा मराठा गोलमेज परिषदेत देण्यात आला आहे. सरकारने फसवणूक केली असल्याचा सूर गोलमेज परिषदेत पहायला मिळाला असून प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांचा निषेध करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी रेसिडन्सी क्लब याठिकाण गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेला राज्यभरातील २५ हून अधिक संस्थांचे प्रतिनिधी, अभ्यासक, संशोधक, संपादक, पत्रकार उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेले २५ वर्षापासून विविध संघटना आंदोलन करत आहेत. पण काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार, सध्याचे भाजप महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात शांततेत ५७ मोर्चे काढले आहेत. आरक्षणाचा प्रश्न सध्या हायकोर्टात प्रलंबित असून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे केवळ मराठा समाजासाठी राखीव असावे, अशी मागणी आरक्षण समितीने केली आहे. ओबीसी समाजाला ज्या सवलती मिळतात त्याप्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळाव्यात यासाठी राज्य सरकारने काही योजना जाहीर केल्या आहेत. मराठा समाजासाठी काही तरी करत असल्याचे दाखवण्यासाठी राज्य सरकारकडून चुकीचे निर्णय घेतले जात असल्याची भावना मराठा समाजात पसरली आहे.

COMMENTS