नारायण राणेंची राज्यसभेतली 6 वर्ष, इंग्रजी-हिंदी शिकण्यातच जातील –सुभाष देसाई

नारायण राणेंची राज्यसभेतली 6 वर्ष, इंग्रजी-हिंदी शिकण्यातच जातील –सुभाष देसाई

मुंबई – शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी राज्यसभेतील निवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे यांची राज्यसभेतली  सहा वर्ष फक्त इंग्रजी आणि हिंदी शिकण्यातच जातील असं देसाई यांनी म्हटलं आहे. तसेच येत्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावरच लढणार असल्याचा पुनरुच्चार सुभाष देसाई यांनी केला आहे. तसेच सहा महिन्यांपूर्वी, फक्त भाजपचे सरकार येणार, अशी त्यांची भाषा होती. कालच्या भाषणात मात्र 2019 ला एनडीएचे सरकार येणार, असं त्यांना बोलावं लागलं. याचा अर्थ त्यांचा आत्मविश्वास डळमळला असल्याचंही देसाई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेनेला अपशकुन करणाऱ्यांची हालत खराब झाली असून छगन भुजबळ तुरुंगात, नारायण राणे महाराष्ट्रातून तडीपार झाले, तर गणेश नाईक घरी बसले असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तसेच राज्यसभेत हिंदी आणि इंग्रजीत बोलावे लागते. त्यामुळे नारायण राणेंना ते शिकायलाच सहा वर्ष निघून जातील. तोपर्यंत त्यांना जनता विसरली असेल. यांची अवस्था पाहून शिवसेना सोडण्याचे कोणी धाडस करणार नाही. कारण ती राजकीय आत्महत्या असेल, अशी जोरदार टीकाही  सुभाष देसाई यांनी केली आहे.

 

COMMENTS