मामाच्या गावात पवारांनी व्यक्त केली खंत !

मामाच्या गावात पवारांनी व्यक्त केली खंत !

कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज गोलिवडे (ता. पन्हाळा) या त्यांच्या आजूळाला भेट दिली आहे. त्यावेळी त्यांनी मामाच्या गावच्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार यांनी पहिल्यांदाच या गावाला भेट दिल्यामुळे ग्रामस्थांतर्फे त्यांचा ग्रामदैवत भैरवनाथांची दीड किलो चांदीची मूर्ती देवून गौरव करण्यात आला. त्यावेळी पवारांनी आपल्या मामाच्या गावची पोरगी करायची राहुन गेली असल्यांची खंत व्यक्त केली आहे.

शरद पवार यांच्या आई शारदाबाई पवार यांचा जन्म या गावातील भोसले कुटुंबामध्ये झाला. भोसले कुटुंबीय काही वर्षांनी कोल्हापूरला वास्तव्यास गेले; परंतु ही आठवण पवार यांना माहिती असल्याने त्यांनी एका जाहिर कार्यक्रमात या गावाला एकदा भेट देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी आज या गावाला भेट दिली असून पवार यांच्या स्वागतासाठी कोतोली फाट्यापासून स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या तसेच गावात गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा केला असल्याचं पहावयास मिळालं आहे.

COMMENTS