बंगळुरु – जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी. कुमारस्वामी बुधवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतल्यानंतर यासंबंधी घोषणा करण्यात आली आहे. कुमारस्वामी काँग्रेसच्या पाठिंब्याने कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेणार आहेत.तसेच कुमारस्वामी यांना 15 दिवसाच्या आत बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी वेळ दिला आहे.
दरम्यान मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अवघ्या 55 तासात कर्नाटकातील भाजपचं सरकार पडलं असून येडियुरप्पा यांनी 17 मे म्हणजेच गुरुवारी सकाळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला. त्यामुळे कर्नाटकात आता काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार सत्तेवर येणार आहे.
दरम्यान भाजपाकडे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने बी.एस.येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा दिला आहे. जनतेने आम्हाला १०४ ऐवजी ११३ जागा दिल्या असत्या तर आम्ही राज्याच नंदनवन केलं असतं असं येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी कर्नाटकाची सेवा करीन तसेच मी परिवर्तन यात्रा सुरु केली त्यावेळी लोकांचा मला भरपूर पाठिंबा मिळाला होता असंही येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे. तसेच मी गरीब आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार बनवण्याचे माझा उद्देश होता. मी मागची दोनवर्ष संपूर्ण राज्याचा दौरा केला आणि वेदना, दु:ख लोकांच्या चेहऱ्यावर पाहिले असून लोकांनी आम्हाला १०४ जागांचा आशिर्वाद दिला. हा जनादेश काँग्रेस आणि जेडीएसला मिळालेला नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS