विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का, 10 नगरसेवक अपात्र !

विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का, 10 नगरसेवक अपात्र !

बीड – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपने आता आपले रंग दाखवण्यास सुरवात केली आहे, मतदानाला अवघा एक दिवस बाकी असताना बीड नगरपालिकेच्या संदीप क्षीरसागर गटाच्या दहा नगरसेवकांना अपात्र ठरवत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. तर सुरेश धस गटाच्या सहा सदस्यांना मतदानाचा अधिकार बहाल करून धस यांचा मार्ग मोकळा केला आहे.

बीड नगरपालिकेच्या अध्यक्षांच्या दालनात नगरपरिषद उपाध्यक्षांसहीत दहा नगरसेवकांनी मोठ्याप्रमाणात कचरा टाकून गोधळ घातला होता. याप्रकरणी या नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. त्यावर या नागरसेवकांचे पद रद्द करण्यात आले होते. त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर स्थगिती मिळाली होती. मात्र या नगरसेवकांचे पद नगर विकासमंत्री रणजित पाटील यांनी अपात्र ठरवले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस असताना राष्ट्रवादीला हा मोठा फटक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी सुरेश धस गटाचे पाच आणि जयदत्त क्षीडसागर गटाचा एका सदस्याला मतदानाचा अधिकार बहाल करून भाजपला मोठी मदत केली आहे.

COMMENTS