बंगळुरु – कर्नाटकात काँग्रेस आणि भाजपमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार संघर्ष सुरु आहे. जेडीएसनं काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसनं सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. दरम्यान काँग्रेसला पाठिंबा दिल्याबाबत जेडीएसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कुमारस्वामी यांनी वक्तव्य केलं असून मला काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांकडून ऑफर मिळाली होती पण 2004 आणि 2005 मध्ये भाजपसोबत युती केल्यामुळे माझे वडील एचडी देवेगौडा यांचं राजकीय कारकीर्दीवर डाग लागला होता. आता देवाने तो डाग हटवण्यासाठी संधी दिली आहे. यामुळे मी काँग्रेससोबत हात मिळवणी केली असल्याचं ते म्हणाले आहेत.
दरम्यान कुमारस्वामींमुळे त्यांच्या ‘सेक्युलर’ प्रतिमेला धक्का बसला होता. कारण मुलाने भाजपसोबत युती करुन 2004 आणि 2005 मध्ये सत्ता मिळवली. त्याचं नुकसान पक्षाला झालं. 10 वर्ष पक्ष सत्तेतून बाहेर राहिला. असं देवेगौडा यांनी म्हटलं आहे. तर निकालाआधी देवेगौडा यांनी जर कुमारस्वामी भाजपसोबत युती करतील तर ते त्यांच्यासोबतचे सर्व संबंध तोडून टाकतील असं म्हटलं होतं. त्यामुळेच काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे.
COMMENTS