जमिनीवर बसून राज ठाकरेंनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

जमिनीवर बसून राज ठाकरेंनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

 नाशिक –  नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चक्क जमिनीवर बसून संवाद साधला. मुंबई महापालिकेत 6 नगरसेवकांनी मनसेला रामराम ठोकल्यानंतर आता त्यांनी आपल्या संवादाची शैली बदलल्याचं दिसतंय.

मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे पक्षाला नवी उभारी देण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांबरोबर राज ठाकरे संवाद साधत आहेत. राज ठाकरे जवळपास 8 महिन्यांनी नाशिकला गेलेत. पक्षाची मरगळ झटकून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय.

 

 

 

COMMENTS