लिंगायत समाजाचा कोल्हापुरात एल्गार !

लिंगायत समाजाचा कोल्हापुरात एल्गार !

कोल्हापूर – लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूरात लिंगायत महामोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाला देशभरातील लिंगायत बांधव उपस्थितील लावणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या मोर्चाची जय्यत तयारी झाली असून पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच या महामोर्चासाठी विविध संघटना आणि समाजानं पाठिंबा दर्शवला असल्यामुळे आतायपर्यंतचा हा सर्वात मोठा मोर्चा निघणार असल्याचं बोललं जात आहे.

शहरातील ऐतिहासिक दसरा चौकमधून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर हा मोर्चा व्हीनस कॉर्नर मार्गे  जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार असून त्यानंतर जिल्हाधिका-यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं जाणार असल्याची माहिती मोर्चाच्या आयोजकांनी दिली आहे.

COMMENTS