जीएसटी म्हणून वसूल केलेला कर सरकार परत करणार का?  – उद्धव ठाकरे

जीएसटी म्हणून वसूल केलेला कर सरकार परत करणार का? – उद्धव ठाकरे

मुंबई –  जीएसटीत दरबदलाबद्दल केंद्र सरकारचं अभिनंदन, पण इतके दिवस वसूल केलेला जीएसटी परत करणार का असा सवाल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

अंगणवाडीसेविकांच्या संपावर तोडगा काढल्याने राज्य सरकारचे आभार मानते. जीएसटीमध्ये बदल करण्याचा निर्णय, सरकारनं दिवाळीची भेट दिलीये असं चित्र निर्माण करण्यात आलं आहे. रेल्वेच्या फुटओव्हर ब्रीजवरील फेरीवाल्यांचा प्रश्न शिवसेनेमुळे सुटला आहे. केंद्र सरकारला हेच सांगाचंय जनतेच्या असंतोषाचा उद्रेक होऊ देऊ नका. भारनियमनामुळे झळा बसतायेत, तात्पुरता दिलासा नको, पूर्ण भारनियमन तातडीने रद्द करा.

यावेळी उद्धव ठाकरे यांना नारायण राणे बद्दल प्रश्न विचारला असता, त्यांना यावर बोलणे टाऴले.

 

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे –

-पेट्रोल – डिझेलचे भाव ज्या पट्टीने वाढवले त्याप्रमाणे कमी करण्यात यावं – उद्धव ठाकरे

-मस्तवाल सत्ताधा-यांना लोकांनी झुकवलं – उद्धव ठाकरे

– जीएसटी म्हणून वसूल केलेला कर सरकार परत करणार का? : उद्धव ठाकरे

-केंद्राने जीएसटीबाबत केलेली घोषणा ही सरकारची भेट नाही तर नाईलाज आहे- उद्धव ठाकरे

– सरकारने दिवाळीची भेट दिली असं चित्र उभं करण्यात आलं आहे – उद्धव ठाकरे.

-उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात, सण कसे साजरे करायचा असा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे, लक्ष्मी केंद्राने नेली आहे.

– केंद्रानं सर्वसामान्यांकडून लक्ष्मी ओरबाडून घेतली, देश आज अस्वस्थ आहे – उद्धव ठाकरे

– अंगणवाडी सेविका, रेल्वे पुलांवरील फेरीवाल्यांचा प्रश्न शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळेच सुटला-  उद्धव ठाकरे यांचा दावा

– अंगणवाडी सेविकांचे प्रश्न मार्गी लावल्याबद्दल राज्य सरकारचे आभार – उद्धव ठाकरे

COMMENTS