Live Update : राज ठाकरे चर्चगेट स्थानकाच्या परिसरात दाखल, रेल्वेच्या अधिकाऱ्यांना भेटणार

Live Update : राज ठाकरे चर्चगेट स्थानकाच्या परिसरात दाखल, रेल्वेच्या अधिकाऱ्यांना भेटणार

पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकावर झालेल्या दुर्घटनेच्या निषेधार्थ मनसेकडून पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे.

Live Update –

मात्र, पोलीस आमचे आमचे आहेत, हे विसरू नका- संदीप देशपांडे
‘नमोरुग्ण’ मला विचारत होते, पोलिसांनी परवानगी नाकरली मग मोर्चा कसा निघणार- संदीप देशपांडे

राज ठाकरे चर्चगेट स्थानकाच्या परिसरात दाखल, रेल्वेच्या अधिकाऱ्यांना भेटणार

-मेट्रो चित्रपटगृहाच्या परिसरात मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

– राज ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली ‘मनसे’च्या संताप मोर्चाला सुरुवात

– राज ठाकरे वरळी सेंच्युरी मिल परिसरात दाखल

– राज ठाकरेंची पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे मेट्रो सिनेमाकडे रवाना

– हा मोर्चा सर्वसामान्यांसाठी, यामध्ये राजकारण नाही, भाजपने आम्हाला राजकारण शिकवू नये – संदीप देशपांडे

– राज ठाकरे यांच्या मोर्चाला  मराठी सेलिब्रिटींचाही पाठिंबा, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशीसह दिग्गज कलाकांरांचं मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन

COMMENTS