Live Update – मुंबईत धडकल भगवं वादळ, मराठा क्रांती मोर्चा

Live Update – मुंबईत धडकल भगवं वादळ, मराठा क्रांती मोर्चा

# मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक – मुख्यमंत्री
# मुख्यमंत्री विधानसभेत निवेदन करत आहेत
# इतर आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या,अजित पवार यांची मागणी

# आझाद मैदान

# पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिष्टमंडळाचं स्वागत केलं.
# मराठा समाजाच्या मुलींच शिष्टमंडळ मुख्यमंत्री भेटीसाठी विधीमंडळात पोहचलं
# मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 650 हून अधिक अभ्यासक्रमात सवलतीची शक्यता
# मराठा समाजाचे शिष्टमंडळ आणि आमदार मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करण्यासाठी रवाना
# मुस्लिम बांधवांच्या विविध संघटनांकडून मोर्चेकरांचे स्वागत
# आझाद मैदानाच्या गेटजवळ विनायक मेटे व रणजीत पाटील यांना चले जावच्या घोषणा देऊन मराठा बांधवांनी रोखले..

# आझाद मैदानाच्या गेटजवळ विनायक मेटे व रणजीत पाटील यांना चले जावच्या घोषणा देऊन मराठा बांधवांनी रोखले..
# आझाद मैदानात मराठा रणरागिणींच्या भाषणाला सुरूवात
# रणरागिंनींनी केलं शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पुजन
# मराठा मोर्चातील सहभागी झालेल्या ३ हजार ५०० स्वयंसेवकांनी रस्ते साफ केले

# राजकिय नेते, आमदार व मंत्री यांना मोर्चेकरी सहभागी होऊन देत नसल्याने काही आमदार विधानभवनात परतले
# आझाद मैदानात भगवं वादळ पोहचलं.

मोर्चेकरी पोलिसांना पाणी देताना…

सीएसटी स्टेशनाबाहेर

 

# मराठा क्रांती मोर्चात दलित समाजही सहभागी झालाय.जातीभेद विसरून इतर समाज बांधवांनीही मराठा मोर्चाला पाठिंबा दिलाय. मी बुद्धिस्ट फाऊंडेशन ही दलित तरूणांची संघटना मराठ्यांना आरक्षण मिळण्याच्या मागणीकरता मोर्चात सहभागी झालीय

 

# काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण थोड्याच वेळात हज हाऊस येथून मराठा क्रांती मोर्चात सहभागी होत आहेत.

# मराठा क्रांती मोर्चातील मोर्चेकर्‍यांनी हुतात्मा चौकात ठाण मांडले; परिसरात वाहतूक कोंडी

# आत्महत्याग्रस्त शेतक-यांची चिमुकली मुले आणि मुली मोर्चाात सहभागी

# सर्वपक्षीय मराठा आमदार मोर्चामध्ये सहभागी….

# जे जे उड्डाण पूलावरील गर्दी

# छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे मराठा समाजाची अभूतपूर्व गर्दी,स्टेशन झालं मोर्चामय.स्टेशन शिवाजी महाराज आणि एक मराठा लाख मराठा च्या जयघोषाने दुमदुमल….

 

 

 

मुंबई – मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातून मराठा समाज बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. क्रांतीच्या पेटत्या मशाली घेऊन हा क्रांती मूक मोर्चा भायखळ्यातून मार्गस्थ झाला आहे. विशेष म्हणजे या मोर्चाचे नेतृत्व युवती करत आहेत. मोर्चात राजकीय प्रदर्शानाला विरोध करण्यात आला. यावेळी मोर्चात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा मोर्चामध्ये प्रदर्शित करण्यास अडवणूक करण्यात आली. तसेच भाजप नेते आशिष शेलार यांना आझाद मैदानावर येण्यास विरोध केला.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी क्रांतीच्या मशाली घेऊन मोर्चेकरी आझाद मैदानावर दाखल होत आहेत. हा मोर्चा आता विधान भवनाला घेराव घालण्यासाठी कूच करणार आहे. त्यासाठी सकल मराठ्यांच्या निवडक सदस्यांचा एक गट स्थापन करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य होईपर्यत विधानभवन न सोडण्याचा निर्णय मोर्चेकऱ्यांनी घेतला आहे.

Live Update –

# शिवसेनेला डिवचू नये, 50 वर्ष सत्तेत होते तेव्हा मराठ्यांची आठवण आली नाही, गुलाबराव पाटील यांचं आव्हाडांना उत्तर

# मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून शिवसेनेचे सर्व आमदार भगवे फेटे घालून सभागृहात

# मोर्चे कसे असावे, हे मराठा मोर्चाने जगाला दाखवलं : खासदार संभाजीराजे छत्रपती

# विधीमंडळात मराठा आरक्षणावरुन गोंधळ, सभागृहात राजदंड उचलण्याचा विरोधकांचा प्रयत्न

# चंद्रकांत पाटील विधानसभेत मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार

 

COMMENTS